प्रा. रा. द. रानडे यांचे भारतीय तत्त्वज्ञानाला योगदान

170.00

वरील पुस्तिकेचे प्रकाशन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय प्रोफेसर डॉक्टर नीतिन करमाळकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
श्रीमत् भगवद्गीतेने सांगितलेल्या भक्तांच्या चार प्रकारांपैकी *ज्ञानी* *भक्त* ही संज्ञा ज्यांना लागू पडते असे आधुनिक युगातले तत्त्वज्ञ -साक्षात्कारी म्हणजे गुरुदेव रा. द. रानडे .त्यांच्या दृष्टीने भक्ती म्हणजे उपास-तापास, सोवळे -ओवळे असे कर्मकांड पाळणे नसून ,मनातला भाव . ही भक्ती डोळस असते .तसेच, तत्त्वज्ञान म्हणजे घट-पटादी शुष्क चर्चा नाही, तर ते साक्षात्काराकडे बोट दाखवणारे असते. अशा तऱ्हेचे उच्च विचार भारतीय तत्वज्ञानात असूनही परदेशी अभ्यासकांचे त्याच्याकडे दुर्लक्ष तर झालेच, शिवाय त्याची उपेक्षा झाली. ही गोष्ट गुरुदेवांना बोचत असे. हे तत्वज्ञान जगापुढे यावे ,त्याचा गौरव व्हावा अशी त्यांची मनीषा होती. पुष्कळसे परंपरागत तत्वज्ञान संस्कृत भाषेत होते. ते बऱ्याच वेळा दुर्बोध शब्द, गुंतागुंतीची शैली किंवा लांबलचक वाक्ये यात अडकून पडले होतेआणि म्हणून पाश्चात्त्यांना रुचत-पचत नव्हते. ” जे सायासे स्तन्य सेवी /ते पक्वान्ने कैसी जेवी//” हे खरेच आहे. आईचे दूध पिताना ज्याला श्रम होतात , ते तान्हुले कडक बुंदीचे लाडू कसे बरे खाईल? भारतीय तत्वज्ञान पाश्चात्त्यांना समजेल आणि उमजेल ,ती मंडळी ते ” सुखाची पाउटी” ग्रहण करतील असा उद्देश असला तर ते सोप्या रीतीने मांडले पाहिजे या भूमिकेतून गुरुदेवांनी नव्या पद्धतीचा अवलंब केला. अर्ध्या जगात
फैलावलेली इंग्रजी भाषा वापरली. भारतीय सिद्धांत पाश्चात्त्यांना परिचित असलेल्या पारिभाषिक संज्ञा वापरून सुगम केल्या . जग केवळ माया आहे या अद्वैत वेदांताच्या सिद्धांताचा सोपा अर्थ सांगितला. जग व्यावहारिक दृष्टीने निश्चितच खरे आहे, कारण घडोघडी त्याचा अनुभव येतो. ( उपलब्धे:) पण आत्म्याच्या ध्यानात तल्लीन झालेल्या अवस्थेत त्याची जाणीव नाहीशी होते. (अनुपलब्धे:), यादृष्टीने त्याला माया म्हणायचे .हे झाले सत्ताशास्त्राबद्दल . बुद्धी कितीही श्रेष्ठ असली तरी अहंकाराने ती पार झाकोळली जाते. हे नीतीशास्त्रातील तथ्य त्यांनी उमा हेमावतीच्या तोंडून वदवले. तज्जप: तदर्थभावनम् या योग सूत्राची महती गिरवण्यासाठी त्यांनी एका मानसशास्त्रीय सत्याचा उपयोग केला –एखादी गोष्ट सतत करत राहिले तर ती सवय बनते म्हणून सदाचारी होण्यासाठी ईश्वराच्या नामाचा जप केला पाहिजे. रामदासांनी केलेल्या संत सभेचे वर्णन त्यांनी बायबलच्या शैलीत Sermon on the Mount
प्रमाणे मांडून ख्रिश्चन धर्मियांच्या डोळ्यापुढे ते दृश्य उभे केले व धर्माधर्मात किती साधर्म्य असते हे दाखवले. अशी उदाहरणे त्यांच्या इतर ग्रंथातून शेकड्यांनी सापडतात. भगवद्गीतेचे अनेक भाषा तून भाषांतर झाले आहे हे खरेच, पण एका वेगळ्या दृष्टिकोनातून गुरुदेवांनी, या आपल्या Sermon on the Chariot ची योग्यता अधोरेखित करून त्या ग्रंथाची प्रतिष्ठा कितीतरी उंचावली.
प्रस्तुत पुस्तिकेत भारतीय तत्त्वज्ञानासाठी किती उपाय गुरुदेवांनी अवलंबले याची चर्चा आहे .वाचकांना ते पावलोपावली आढळतील .हिचा मराठी भावानुवाद पूर्ण झाला असून त्याची पुढची कार्यवाही चालू आहे
अश्विनी (मीरा)अविनाश जोग.
सोलापूर.
(वरील परिक्षण आदरणीय पद्मा ताई कुलकर्णी यांच्या सहकार्याने लिहिले आहे)

Category:

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “प्रा. रा. द. रानडे यांचे भारतीय तत्त्वज्ञानाला योगदान”
Shopping Cart