आत्मानंद व त्याचे जीवनातील स्थान.
लेखिका पद्माताई कुलकर्णी.
(प्रोफेसर रा.द. रानडे स्मारक व्याख्यान माला .सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे.) (1982) .
आवृत्ती दुसरी 2022
आत्मानंद हा इंद्रियजन्य सुखापेक्षा किंवा बौद्धिक समाधानपेक्षा निराळा आहे. त्याची खिरापत वाटता येत नाही, तो रस्त्यावर पडलेला नाही. त्यासाठी नामस्मरणाचे तेल घालून भक्तीची ज्योत प्रज्वलीत ठेवावी लागते.
आनंद हा शब्द आपण हजारदा ऐकतो पण त्याचे विश्लेषण करत नाही.या पुस्तिकेत त्याचे विश्लेषण केले आहे. गुरुदेव रानडे एके ठिकाणी म्हणतात की ,”कित्येक दिवस मला असे वाटते की आनंद व शांती या मध्ये एक प्रकारचा विरोधाभास आहे कारण सुख हे उत्साहित करणारे (Elative) असून शांतीने समचित्तता(Equanimity) येते. आता मात्र मी या निष्कर्षाप्रत येऊन पोहचलो आहे की पराशांती हीच श्रेष्ठ आहे. या शांतीचा उगम आनंदातून आहे.अशा शाश्वत आनंद व शांती याचा अनुभव घेणाऱ्याचे चित्त कशानेही विचलित होत नाही असे भगवद्गीता सांगते .खऱ्या आनंदाचा कळस अशीही शांती आहे.
शांती हा शब्द सुद्धा तोंडावाटे न काढता तिचा अनुभव घेणे या स्थितीला गुरुदेव रानडे ओठ मिटून परमानंदात मग्न होणे(Silent enjoyment of God.) असे म्हणतात.
आज संपूर्ण जगाला एका अनोख्या चिंतेने ग्रासले आहे. अशावेळी यजुर्वेदा मधील “विश्वात सर्वत्र शांतीचे साम्राज्य येवो “.अशी सद्भावना प्रकट करणाऱ्या मंत्राची आठवण करून देणारी ही पुस्तिका आहे.
अश्विनी (मीरा)अविनाश जोग.
सोलापूर.
आत्मानंद व त्याचे जीवनातील स्थान
₹170.00

Reviews
There are no reviews yet.