निंबरगी संप्रदायाच्या इतिहासातील गुरुदेव रा. द. रानडे यांच्या सिटिंगमधील गुरू – शिष्यसंवादाची काही पाने

150.00

पू गुरुदेवांची Sittings हे सर्व साधकांसाठी अमृत रसपान असे, त्यात सहभागी सर्वांस प्रश्न विचारण्याची मुभा असे.Sittings ची वेळ ठरलेली नसे पण त्यासाठी घंटा वाजविली गेल्यावर सर्वजण एका हॉल मध्ये लगबगीने एकत्र होत.पू गुरुदेव मध्येच एखाद्या साधकास अभंग म्हणायला सांगत अथवा सद्गुरु भाऊसाहेब महाराज अथवा पू बाबांच्या आठवणी सांगायचा निर्देश करीत. बोलताना हलकासा विनोद करून पू गुरुदेव वातावरण आनंदी ठेवीत असत. तत्वज्ञान विषयाचे जागतिक कीर्तीचे प्राध्यापक,संशोधक असूनही भक्तीसाम्राज्याचे अधिष्ठान असणारे असेच Sittings चे वैशिष्ट होते.

Category:

पू गुरुदेवांची Sittings हे सर्व साधकांसाठी अमृत रसपान असे, त्यात सहभागी सर्वांस प्रश्न विचारण्याची मुभा असे.Sittings ची वेळ ठरलेली नसे पण त्यासाठी घंटा वाजविली गेल्यावर सर्वजण एका हॉल मध्ये लगबगीने एकत्र होत.पू गुरुदेव मध्येच एखाद्या साधकास अभंग म्हणायला सांगत अथवा सद्गुरु भाऊसाहेब महाराज अथवा पू बाबांच्या आठवणी सांगायचा निर्देश करीत. बोलताना हलकासा विनोद करून पू गुरुदेव वातावरण आनंदी ठेवीत असत. तत्वज्ञान विषयाचे जागतिक कीर्तीचे प्राध्यापक,संशोधक असूनही भक्तीसाम्राज्याचे अधिष्ठान असणारे असेच Sittings चे वैशिष्ट होते.
ह्या पुस्तकात साधकांनी विचारलेले विविध प्रश्न आणि त्यास पू गुरुदेवांनी दिलेली समाधानकारक उत्तरे ह्याचा जणू अपूर्व मिलाफ आहे.ज्ञान,कर्म, भक्ती, योग, चमत्कार, पारमार्थिक अनुभव, संमोहन,आत्मानंद, ईश्वराकर्षण (Theotropism) अशा अनेकविध विषयांची चर्चा आहे.
परमार्थाची वाटचाल सरळ नसते, त्यात अनेक अडथळे असतात.*भक्ती तो कठीण| सुळावरील पोळी* हे श्रीतुकाराम महाराजांचे वचन प्रसिद्ध आहेच. साक्षात्कार हा नैतिक अधिष्ठानाशिवाय शक्य नाही हे गुरुदेव सांगत. चमत्कार जसे निसर्गात आहेत तसेच संतांच्या जीवनात पाहायला मिळतात पण त्याचे कर्तेपण ते स्वतःकडे घेत नाहीत तर ते देवाच्या कृपेने घडतात हे पू गुरुदेव स्पष्टपणे सांगत.
पू गुरुदेवांचे जीवन अनुभवांची खाण होते त्याचा तिळमात्र अहंकार त्यांना नव्हता कारण सद्गुरुकृपा आणि अंत:करणाची शुद्धता ह्या दोन गोष्टी ते सर्वोच्च मानीत.मी लिहिलेल्या ग्रंथातून स्वतःला अनुभव आला नाही अशी एकही गोष्ट नाही हे ते निक्षून सांगत.*जया सद्गुरु तारू पुढे| जे अनुभवाचिया कासे गाढे||* (श्रीज्ञानेश्वरी ७.९८) हाच प्रगल्भ अनुभव त्यांच्या जीवनाचे सार होते.
अतींद्रिय अनुभव हा आनंद आणि भीतीचे मिश्रण असते हे सांगताना उत्तम नेम होणे हे देवाच्या कृपेवर अवलंबून आहे ही प्रांजळ भावना त्यांच्या बोलण्यातून व्यक्त होई.आपले मत ते कोणावर लादत नसत.माझी राहणी हेच माझे तत्त्वज्ञान आहे हे प्रतिपादीत करताना आपले साधन सातत्याने आणि निष्ठेने जपले पाहिजे हा त्यांचा आग्रह असे.नाम घेण्यास आलेल्या व्यक्तीला बऱ्याच वेळा ते ज्ञानेश्वरी, दासबोध वाचायला सांगत तसेच इंचेगिरी, निंबर्गी ह्या गुरुस्थानांस भेट देण्यास सुचवीत असत.पू गुरुदेवांना विज्ञानातील विविध शाखांमध्ये रस होता, त्या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी आल्यास ते विस्तृत चर्चा करीत.
शेवटच्या प्रकरणात काही मान्यवर साधकांच्या भेटी गाठी अनुभव ह्याची माहिती पुस्तकात आहे.ज्येष्ठ नेते गंगाधरराव देशपांडे ह्यांनी लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी ह्यांचे सोबत काम करताना दोघांनाही ईश्वराविषयी अतूट श्रद्धा होती ह्याची आवर्जून नोंद केली आहे.प्रचंड सामाजिक राजकीय कार्य करताना आपल्याला मानसिक शांतीसाठी पू गुरुदेवांच्या मार्गदर्शनाचा लाभ झाला ह्याची कबुली दिली आहे.पू गुरुदेवांनी सुद्धा विश्वधर्माची स्थापना करणे हे आजच्या परिस्थितीत रामबाण औषध असल्याचे मत व्यक्त केले आहे.
साधकांना भेडसावित असणाऱ्या अनेक प्रश्नांची सविस्तर चर्चा ह्या पुस्तकात असल्याने आदरणीय पद्माताई कुलकर्णी आणि सुधा सराफ ह्यांनी मूळ ग्रंथाचा केलेला मराठी अनुवाद हा पथदर्शी आणि परमार्थाचा नेमका अर्थ प्रतीत करणारा आहे,तो प्रत्येकाने संग्रही ठेवावा असाच सर्वोत्तम आहे! *आणि संवादाचेनि मिषे* हे ब्रह्मवस्तू अनुभविण्याचे साधन आहे हाच ग्रंथाचा उद्देश सफल व्हावा ही प्रार्थना!
Excerpt from book review written by Shri. Sanjeev ji Kasurkar

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “निंबरगी संप्रदायाच्या इतिहासातील गुरुदेव रा. द. रानडे यांच्या सिटिंगमधील गुरू – शिष्यसंवादाची काही पाने”
Shopping Cart