पू निंबरगी महाराज, पू भाऊसाहेब महाराज उमदीकर,पू अंबुराव महाराज तथा बाबा, पू रा द तथा गुरुदेव रानडे आणि पू श्रीमती शिवलिंगव्वा ह्या संप्रदायातील प्रमुख अधिकारी व्यक्ती आहेत.ह्या ग्रंथात त्यांच्या स्थानाचा इतिहास वर्णन केला आहेच त्याबरोबरीने संप्रदायातील घटना,उपासना,पदे आणि काही ग्रंथ विषयक माहिती आहे.सर्वानाच ह्या बाबत पूर्ण माहिती अवगत व्हावी ह्या उद्देशाने केलेले हे विस्तृत संकलन आहे.
पू निंबरगी महाराज हे संप्रदायाचे मूळ पुरुष, शुद्ध चारित्र्य,साधनेच्या जोरावर त्यांचे निरूपण लोकांना सन्मार्ग दाखवीत असे. निंबरगी येथील हनुमान मंदिराजवळ आज श्रीनिंबरगी महाराजांचे समाधी मंदिर उभे आहे. त्यांचे शिष्य भाऊसाहेब महाराज उमदीकर ह्यांनी इंचगिरी येथे आपल्या गुरुंचे देऊळ बांधले, शिखराचे काम कालांतराने झाले. पुढे निंबरगी समाधी मंदिरात वज्रलेपाचे कार्यही पूर्ण झाले.भाऊसाहेब महाराजांचे वास्तव्य उमदी आणि इंचगिरी येथे असे,तेथेच त्यांचे समाधी मंदिर पण आहे.पू बाबा आणि पू गुरुदेव हे भाऊसाहेब महाराजांचे अनुग्रहित, बाबांचे जन्मस्थान जिगजेवणी तेथे अलीकडेच मंदिर बांधण्यात आले आहे.पू गुरुदेवांचे जन्मस्थान जमखंडी,त्यांचे तेथील घर आता परमार्थ मंदिर बनले आहे.पू गुरुदेवांनी निंबाळ रेल्वे स्टेशन नजिक आश्रम आणि राहते घर बांधले आहे.पू गुरुदेवांचे निर्वाण येथेच झाले,हे समाधी मंदिर आहे.गुरुभगिनी शिवलिंगव्वा ह्यांची समाधी जत येथे आहे. ह्याशिवाय पू गुरुदेवांशी निगडित अलाहाबाद, बेळगाव ह्या स्थानांचा संदर्भ ह्या पुस्तकात आहे.निंबरगी संप्रदायाची ही तीर्थक्षेत्रे आहेत,सर्व ठिकाणी उत्सव, नेम आणि विविध उपक्रम संपन्न होतात ही नोंद डॉ अश्विनीताईनी (मीरा) ग्रंथात अंतर्भूत केली आहे.
संतांना मुळातच भजन प्रिय असते. नेम करताना पदे म्हणण्याची पद्धत पू भाऊसाहेब महाराजांनी घालून दिली. ह्या पदांमध्ये संतांचे अभंग, कानडी पदे, हिंदी पदे ह्यांचा समावेश असे.पू गुरुदेव साधकांचे कडून पदे म्हणवून घेत. बाबासाहेब संगोराम,डॉ मोडक, डॉ परिपत्येदार, वामनराव कुलकर्णी, नी र जेऊरकर,कृष्णा तडलगी, भक्त मालाबाई दीक्षित अनेकांना पदे म्हणण्याच्या सेवेची संधी लाभत असे आणि पू गुरुदेव भावपूर्ण गायलेल्या पदांची प्रशंसा करीत,प्रसंगी अर्थ पण सांगत.प्रख्यात गायक मास्टर कृष्णराव ह्यांचेकडून गुरुदेवांनी *तुझिये निढळी कोटी चंद्र प्रकाशे* हा अभंग गाऊन घेतला होता,त्याची अनुभूती अनुभवली होती. ग्रंथात जवळपास दोनशे पदांचा उल्लेख, ते केंव्हा आणि कोणी म्हंटले ह्याची तपशिलासह माहिती सांगितली आहे हे विशेष आहे.*सद्गुरुचरण वंदूनि शिरी* हे भाऊसाहेब महाराजांचे वरील पद ऐकताना पू गुरुदेवांना अतीव आनंद होत असे.
गेली पन्नास वर्षे निंबाळला पुण्यतिथी उत्सवात पालखी सोहळा निघतो त्याचे वर्णन आणि पालखीसमोर म्हणण्यात येणारी पदे असे स्वतंत्र प्रकरण आहे. *धन्य धन्य हो प्रदक्षिणा* हे भजन रंगनाथ स्वामी निगडीकर ह्यांचे असल्याचे अभ्यासपूर्ण संशोधन श्रीमती डॉ जोग ह्यांनी केले आहे.
ज्येष्ठ साधक पद्माताई कुलकर्णी ह्यांनी पू गुरुदेवांच्या बायबल ग्रंथाच्या अभ्यासाचे विवरण करणारे प्रकरण पुस्तकात समाविष्ट आहे. बायबल मधील अनेक Quotes गुरुदेवांनी आपल्या विविध ग्रंथात घेतले आहेत त्याचा संदर्भ पद्माताई देतात.*The Region of Bliss is the Apocalypse of Ramdasa* असे मांडताना समर्थांच्या आनंदवनभुवन संकल्पनेशी तुलनात्मक विचार व्यक्त झाल्याचे पू गुरुदेवांचे मत श्रीमती पद्माताई नमूद करतात.प्रा सोनोपंत दांडेकर विद्यार्थांना शिकवताना पू गुरुदेव रानडे ह्यांचे वाक्य *It is better to be a mystic satisfied than a sacretes satisfied* म्हणजे साक्षात्कारी व्यक्तीचा अतींद्रिय अनुभव सॉक्रेटिसच्या बौद्धिक समाधानाहून श्रेष्ठ आहे ह्याचा दाखला देत.
भाऊसाहेब महाराज असताना १९११ साली संप्रदायाची नित्य नेमावली तयार करण्यात आली होती. गेल्या शंभर वर्षात त्यात बरेच बदल झाले त्याच्या क्रमवार नोंदीचा तक्ता ह्या पुस्तकात समाविष्ट केला आहे. ह्याकामी डॉअश्विनी ताई( मीरा)जोग ह्यांनी अथक परिश्रम घेतले आहेत त्याचा लाभ भाविकांना, जिज्ञासूंना निश्चित होईल.
निंबरगी संप्रदायाची सांस्कृतिक पार्श्वभूमी स्पष्ट करताना निंबरगी, इंचगेरी, उमदी, जिगजेवणी,निंबाळ ही स्थाने तपोभूमी आहेत त्याचा प्रत्यय येतो असे डॉ अश्विनी (मीरा)जोग अधोरेखित करतात. *तपाचे सामर्थ्य तपिन्नला अमूप* (हरिपाठ) नुसार निंबरगी संप्रदायातील ह्या सर्व पवित्र स्थानांचे आणि महानुभाव व्यक्तींचे महत्व अबाधित होते,आहे आणि पुढेही राहील!
Excerpt from book review written by Shri. Sanjeev ji Kasurkar
Other Authors
निंबरगी संप्रदायाच्या इतिहासातील विविध पाने
₹150.00
पू निंबरगी महाराज, पू भाऊसाहेब महाराज उमदीकर,पू अंबुराव महाराज तथा बाबा, पू रा द तथा गुरुदेव रानडे आणि पू श्रीमती शिवलिंगव्वा ह्या संप्रदायातील प्रमुख अधिकारी व्यक्ती आहेत.ह्या ग्रंथात त्यांच्या स्थानाचा इतिहास वर्णन केला आहेच त्याबरोबरीने संप्रदायातील घटना,उपासना,पदे आणि काही ग्रंथ विषयक माहिती आहे.सर्वानाच ह्या बाबत पूर्ण माहिती अवगत व्हावी ह्या उद्देशाने केलेले हे विस्तृत संकलन आहे.
You must be logged in to post a review.
Reviews
There are no reviews yet.